Saturday, July 3, 2010

पावसाळा

दरवर्षी येतो का पावसाळा
धरीत्रीला हिरवा रंग देण्यासाठी
दरवर्षी येतो का पावसाळा
झाडांनासुद्धा वेगवेगळा रंगाने रंगवण्यासाठी
दरवर्षी येतो का पावसाळा
विहिरी, नद्या, तळ्यांचा तळ भरण्यासाठी
दरवर्षी येतो का पावसाळा
समुद्राचा खारटपणा कमी करण्यासाठी
दरवर्षी येतो का पावसाळा
प्रत्येक थेंबागणीक हे सांगण्यासाठी
की मी सुद्धा कोणीतरी आहे
दरवर्षी येतो का पावसाळा
घसगुंड्यांची वाढ करण्यासाठी
दरवर्षी येतो का पावसाळा
अपघातांची नोंद वाढवण्यासाठी
दरवर्षी येतो का पावसाळा
थेंब थेंब तळे साठे हे सांगण्यासाठी

No comments:

Post a Comment