Wednesday, October 5, 2011

एकदा चित्रगुप्त विचारात पडले होते, व थोडेसे अस्वस्थही वाटत होते, असेच चार पाच दिवस गेले. त्यांचा हा अस्वस्थपणा काही जणांच्या ध्यानात आला, जे आपल्या पूढच्या जन्मात गाढव, डुक्कर, माकड, कोल्हा, लांडगा, गीधाड, जळू (जे रक्त शोषून घेते ते) म्हणून जन्म घेणार होते.
त्यानी चित्रगुप्तला विचारले.


काय झाले चित्रगुप्त महाराज.

चित्रगुप्त म्हणाले. ‘काय सांगू, तुम्हा सगळ्यांना पृथ्वीवर परत जन्माला घालायचे आहे, पण काय करणार, पृथ्वीवर सध्या तुमच्या योनीची संख्या फुल्ल झालेली आहे, पण तुम्हाला तर आत्ताच पाठवायचे आहे, काय करायचे ते कळतच नाही’

त्यानी चित्रगुप्ताना विचारले ‘अहो चित्रगुप्त महाराज, माणसांचीही फुल्ल झाली आहे का ?’

चित्रगुप्त म्हणाले ‘माणसाच्या खूप जागा आहेत.’

ते परत म्हणाले ‘अहो चित्रगुप्त महाराज, मग त्यात काय मोठे आहे, तुम्ही आम्हाला माणसांच्या योनीत पाठवाना.’

चित्रगुप्त म्हणाले ‘असे कसे करता येईल, हे तुम्हाला गाढव, डुक्कर, माकड, कोल्हा, लांडगा, गीधाड, जळू (जे रक्त शोषून घेते ते) म्हणून जन्म घायचा आहे, अन तुम्ही माणूस म्हणून जन्म घेउ पहात आहात’

यावर ते म्हणाले ‘अहो चित्रगुप्त महाराज, तुम्ही आम्हाल माणूस म्हणून पाठवले तरी आम्ही आमचा गुणधर्म थोडाच सोडणार आहोत, आम्ही आम्हाला गाढव, डुक्कर, माकड, कोल्हा, लांडगा, गीधाड, जळू (जे रक्त शोषून घेते ते) म्हणून जगायचे होते त्याच तर्‍हेने जगणार.

हे त्यांचे म्हणणे चित्रगुप्तांना आवडले अन ते म्हणाले ‘मला आवडले, मी आता तुम्ही म्हणता तसेच करतो, चला मोठ्ठा गुंता सुटला.’

सध्या जी काही माणसे आपण पहातो ती याचाच परीणाम आहे असे आपल्याला वाटते का ?

No comments:

Post a Comment