कोठे गेला तो घननीळा श्रावणातला
रिमझीम तर सोडाच
टपटप देखील नाही झाले आता
तर हिरव्या मोरपीसांची बातच सोडा
नाही राहीली राधा, नाही शाम आता
जीथे तीथे राहीली वासनाच आता
येशील का रे शाम तू परत
प्रेमाचा अर्थ समजवायाला
येशील का रे राम तू परत
मनूष्य कर्तव्याची जाण शिकवायला
येशील का रे बुद्धदेवा तू परत
शांतीचा संदेश द्यायला
येशील का रे बुद्धिदायका तू परत
या सर्वांची बुद्धि ठीक करायला
येशील का गुरुदेवा तू परत
शिष्याची महती समजवायला
येशील का महीषासुर मर्दिनी तू परत
या अबलांना सबल बनवायला
येशील का मत्स्य तू परत
या भरकटलेल्या पृथ्वी जीवांना
दिशा दाखवायला.
Friday, August 6, 2010
Subscribe to:
Posts (Atom)