Saturday, October 10, 2009

मीAlign Center
हा 'मी' कोठे असतो ?
असतो का तो डोळयामध्ये ?
पण डोले नसलेल्यामध्ये सुद्धा 'मी' असतोच.

असतो
का तो कानामध्ये ?

पण बहिरयामध्ये सुद्धा 'मी' असतोच
असतो का तो आपल्या सुन्दर चेहेरयात ?
पण सुन्दते मध्ये जसा तो असतो

तसा तो कुरुपते मध्ये
सुद्धा असतो
असतो का तो आपल्या हातामध्ये ?

पण हात नसलेल्या मध्ये सुद्धा 'मी' असतोच

असतो का तो आपल्या पायात
पण पाय नसलेल्या मध्ये सुद्धा 'मी' असतो
असतो का तो फक्त शहाण्यामध्ये ?

पण वेडे सुद्धा 'मी' आहे असेच म्हणतात

असतो का तो आपल्या मेंदुमध्ये ?

परन्तु मेंदू रहित माणसे सुद्धा 'मी' आहे असेच म्हणतात

असतो का तो आपल्या ह्रुदयात ?

पण ह्रदयहीन माणसे सुद्धा 'मी' आहेच असे म्हणतात

मग हा 'मी' असतो कोठे ?
आपण ज्याला आत्मा म्हणतो तोच 'मी' का?
मग आपले 'मन' कोठे असते?
एक अनुत्तरित प्रश्न.


जन्म एक प्रश्नचिन्ह



जन्मलो असेन का मी
वळलेल्या मुठीमध्ये एक स्वप घेउन
त्या कोणाचा शोध घेण्यासाठी?
पण गेलो असेन या गर्दीमध्ये
साफ हरवून स्व:ताला

जन्मलो असेन का मी
मागच्या जन्मीचे पापाचे गाठोडे घेउन
या जन्मीसुद्धा त्यात भर घालण्यासाठी

जन्मलो असेन का मी
तेच रडगाणे घेउन
अन इतराना दुषाने देण्यासाठी

जन्मलो असेन का मी
स्व:ताच्या नजरेने इतराना दृष्ट लावण्यासाठी

जन्मलो असेन का मी
इतरांच्या सुरांमध्ये
आपला बेसुर मीळविण्यासाठी

जन्मलो असेन का मी
इतरांची स्वप्ने भंग करण्यासाठी

जन्मलो असेन का मी
इतरांच्या नजरेतून उतरण्यासाठी

जन्मलो असेन का मी
अध्यात्मिक 'मी' च्या
जवळपास पोहोचण्यासाठी

जन्मलो असेन का मी
एक नको असलेले
प्रश्नचिन्ह बनुन रहाण्यासाठी?
मुक्ति म्हणजे काय?
आपण जे शालेय शिक्षण घेतो ते आपल्या धर्मात सांगीतल्याप्रमाणे आत्मउन्नत्तिसाठी, मुक्तीसाठी उपायकारक आहे की अपायकारक?

पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि त्या वरचे आपण जे शिक्षण घेतो त्याचा व्यवहारात किती फायदा होतो.
आपण आपल्या आयुष्यातील सरासरी पंधरा वर्षे निव्वळ शिक्षणासाठी घालवतो, म्हणजे आपल्या देशाच्या सरासरी आयुष्यमानाप्रमाणे सुमारे २५ टक्के आपले आयुष्य शिक्षणासाठी घालवतो. हे जे शिक्षण आपण घेतो त्याचा आपल्या धर्मात सांगीतल्याप्रमाणे आत्म उन्नत्तिसाठी फायदा होतो. मुक्ति साठी फायदा होतो.

आपल्या शिक्षण पद्धति बद्दल आपल्याला काय वाटते? सध्या जी मूलं शालेत, कॉलेज मध्ये शिकतात किंवा शालेत, कॉलेज मध्ये जातात ते फक्त परीक्षेत ज्यादा गुण मिळविण्यासाठी की त्या शिक्षणाचा उपयोग आपल्या पुढील आयुष्यात करण्यासाठी?

वर्षभर शालेत, कॉलेज मध्ये जाणे अन परीक्षा जवळ आली म्हणजे जोरात अभ्यासाला लागणे, हे कशाचे द्योतक आहे.

आपल्या शिक्षण व्यवस्थेतसुद्धा केवळ परीक्षेसाठी म्हणुन सुट्टी का दिली जाते? हे जाहिर करण्यासाठी की वर्षभर मजा करा आणि परिक्षेच्या सुट्टीत अभ्यास करा, व केवळ certificate मीळविण्यासाठी?

आता तर असे पहायला मिळते की ज्याच्याकडे उच्च शिक्षणाचे certificate आहे त्याला त्या विषया बद्दल माहिती नसते किंवा जुजबी माहीत असते पण त्या certificate च्या आधारावर त्याला नोकरी मिळते. पण ज्यांच्याकडे त्या विषयाबद्दल माहिती असते व जे eligible असताना सुद्धा जे बेकार असतात ते?

Blank Mind

|| श्रीराम समर्थ ||

आपल्या मनात प्रत्येक क्षणाला कितीतरी विचारांचे काहुर माजलेले असते. अशा विचारातील काळ, क्षण आपल्याला सतत पकड़ता यईल का? म्हणजे एक विचार आला अन गेला, लगेच दूसरा विचार आला, पण या दोन विचारातील काळ, क्षण सतत साधायचा म्हणजे विचार रहित रहायचे (Totally Blank) असे आपल्याला करता यईल का? आपल्या संपूर्ण आयुष्यातील एखादा तरी क्षण आपण अनुभवू शकेल का?

कदाचित संत असेच जगत असतील, खरं तर ते जगतच नसतात ते प्रत्येक क्षण अनुभवत असतात व त्याचा आस्वाद इतराना देत असतात. आपल्या आयुष्यात असे किती बारे क्षण येत असतील?

आपला धर्म आत्म उन्नति करा, मुक्तीच्या मार्गावर जा असे सांगतो. आपले अंतिम ध्येय मुक्ति असले पाहिजे व ते मनुष्य योनीत शक्य आहे असे सांगतो.