Wednesday, October 20, 2010

XIX Commonwealth Games 2010 Delhi

XIX Commonwealth Games 2010 Delhi मध्ये पदक जिंकलेल्या भारतीय खेळाडूंना इनामे जाहीर झाली, त्यातील बहूतेक खेळाडूने भावना व्यक्त करताना असे म्हटले की मिळालेल्या बक्षीसातील रक्कम आपण प्रथम या खेळासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी वापरेन. आपल्या क्रीडा मंत्र्यांनी जरा या बाबीकडेही लक्ष द्यावे.



ही परीस्थिती त्यांच्यावर का ओढवली हे आपल्या 'अंतरात्म्याच्या ' आवाजाला परत परत विचारावे, म्हणजे कधी तरी ही परीस्थिती बदलेल याची आशा करता येईल, व आपल्या खेळाडुंनी स्वःताच्या जोरावर मिळवलेल्या यशाचा उगाच ढोल वाजवत फिरु नये.

आम्हाला व्यक्ति स्वातंत्र्य पाहीजे
पण त्याबरोबर येणारी बंधने नकोत
आम्हाला स्वातंत्र्य पहीजे
पण आम्हाला स्वातंत्र्याची बंधने नकोत
आम्हाला समाज पहीजे
पण सामाजिक बांधीलकी नको
आम्हाला विचार स्वातत्र्य पहीजे
पण वैचारिक विचार नकोत
आम्हाला आचार स्वतंत्र्य पहीजे
पण आचार संहीता नको

Tuesday, October 12, 2010

आपले मन कीती फास्ट (चपळ) असते, ते महा संगणकापेक्षा (सुपर कॉप्यूटर) पेक्षा चपळ असते का?








































परंपरा जपण्यात आपण भारतिय (इकडे 'ति' की 'ती' लीहावा?) कीती पटईत आहोत नाही.

जरा जून्या परंपरा बाजूला करा, पण या नव्‍या परंपरेकडे पहा.

माझ्या पणजोबाने प्रत्येक निवडणूकीत अमक्या पक्षाला मत दिले, माझ्या
...आजोबाने तेच केले, माझ्या वडीलानेही तेच अन आता तोच कीत्त मी गिरवणार आहे.

यमका मागून यमक जुळवणे म्हणजे कवीता करणे का?

Thursday, October 7, 2010

बक्षीसांची झाली खैरात
उत्तर कळवा बक्षीस मिळवा
कौन बनेगा करोडपती
बनेगी अपनी बात
उत्तर शोधा परदेश गाठा
उत्तर कळवा गाडी मिळवा
उत्तर कळवा अलंकार मिळवा
झालोत आपण उत्तर शोधण्यात दंग

पण स्वःताबद्दलचे 'स्व' बद्दलचे उत्तर कधी शोधणार ?

नाही माझ्या जवळ
वेळ 'स्व' बद्दलचे उत्तर शोधायला
काय मिळणार फुकटचे उपद्व्यप करुन ?
का म्हणून त्या 'स्व' च्या वाटेला जायचे ?
माझे आयूष्य कुठे सरले अजून ?

कसले ते आत्मज्ञान कसले ते अध्यात्म ?
नसती उठाठेव सारी
हा तर नूसता मूर्खपणाचा खेळ
हे तर नीव्वळ थोतांड
पैसे उकळण्याचे धंदे सगळे
नाही पडणार मी त्या फंदात

झालेत कित्येक मूर्ख या वेडापायी
नाही जमले जगणे त्यांना
नाही समजला जगण्याचा अर्थ त्यांना
आम्ही पहा कसे जगतो ते
खा प्या मजा करा, हाच जीवनाचा अर्थ खरा
जय नोटेश्वर, जय पैशेश्वर