बक्षीसांची झाली खैरात
उत्तर कळवा बक्षीस मिळवा
कौन बनेगा करोडपती
बनेगी अपनी बात
उत्तर शोधा परदेश गाठा
उत्तर कळवा गाडी मिळवा
उत्तर कळवा अलंकार मिळवा
झालोत आपण उत्तर शोधण्यात दंग
पण स्वःताबद्दलचे 'स्व' बद्दलचे उत्तर कधी शोधणार ?
नाही माझ्या जवळ वेळ 'स्व' बद्दलचे उत्तर शोधायला
काय मिळणार फुकटचे उपद्व्यप करुन ?
का म्हणून त्या 'स्व' च्या वाटेला जायचे ?
माझे आयूष्य कुठे सरले अजून ?
कसले ते आत्मज्ञान कसले ते अध्यात्म ?
नसती उठाठेव सारी
हा तर नूसता मूर्खपणाचा खेळ
हे तर नीव्वळ थोतांड
पैसे उकळण्याचे धंदे सगळे
नाही पडणार मी त्या फंदात
झालेत कित्येक मूर्ख या वेडापायी
नाही जमले जगणे त्यांना
नाही समजला जगण्याचा अर्थ त्यांना
आम्ही पहा कसे जगतो ते
खा प्या मजा करा, हाच जीवनाचा अर्थ खरा
जय नोटेश्वर, जय पैशेश्वर
Thursday, October 7, 2010
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment