Tuesday, October 25, 2011

मनात असो वा नसो
शुभेच्छांना तोटा नाही.

मनात असो वा नसो
शब्दांचा तुटवडा नाही

मनात असो वा नसो
चेहेर्‍यावरील हास्याला तोटा नाही

मनात असो वा नसो
असे बरेच काही आहे त्याला तोटा नाही
मी सहज बोलता बोलता म्हणालो

मी : एकदा काय झाले माहीत आहे ?

समोरचे : हु (असे म्हणाले)

मी : तुम्हाला जर माहीतच आहे तर परत तेच सांगून माझा वेळ अन श्रम आणि तुमच्या कानाच्या पडद्याची झीज का करु ? काय बरोबर आहे ना माझे ?.
आमी ल्हान आस्ताना PWD म्हणजे 'परसाकडे व्हरपाचो डबो' असो full form कोरताले, सद्या हो full form सामको फिट्ट बसता, तुमचे कीदे म्हणणे आसा, हाजेर ?

in fact whole State government is PWD now a days

including Central Government

Wednesday, October 19, 2011

तुम्हाला कोण व्हायचे आहे पालखीचे भोई की पालखीत बसलेला तो ?

तुम्हाला कोण व्हायचे आहे पालखीचे भोई की पालखीत बसलेला ‘तो’ ?

आम्ही म्हणतो जगाची लोकसंख्या 600 कोटी आहे, ती जास्तच असेल.

प्रत्येकाची कथा (story) निराळी, कोण लीहीत असेल त्या कथा ?

600 कोटी ही तर फक्त माणसांची संख्या. पण इतर जे नीव जंतू यांची संख्या कोणी जीवीत मनूष्य सांगू शकेल का ?

त्या प्रत्येक जीवीतांची कथा कोण लीहीत असेल बरे

संजयानंद

Sunday, October 16, 2011

काल समीरने(माझा भाऊ) मला विचारले

समीर : खुप माणसे कुत्री का पाळतात सांग बगुया ?

मी : का ?

समीर : कारण त्यांची मुले त्यांचे ऐकत नाहीत.

Wednesday, October 12, 2011

तो नाही म्हटले म्हणून त्याचे काहीच बिघडत नाही.

नास्तीक नास्तीकतेवर विश्वास ठेवतो हा सुद्धा अंधश्रद्धेचाच भाग आहे.

संजयानंद
सत्याला जे सत्य मानीत नसतात, ते नकळत का असेना पण असत्याचीच बाजू घेत असतात.

संजयानंद

Monday, October 10, 2011

रिटयर्डमेंट टाइम

बरीच वर्षे साधारण एकाच तर्‍हेच्या वेळापत्रकातून गेलेल्या माणसाला काही दिवसानंतर आपण या वेळापत्रकाच्या बाहेर फेकलो जाणार आहे याची जाणीव होत असते अन जस जसा तो दिवस जवळ येत जातो तस तसे बरेच पूरुष आपण आता नोकरीतून निवृत्त होणार याचा घोषा लावत असतात, मग मी मुक्त पाहीजे तेव्हा उठणार माझ्या राहीलेल्या इच्छा पूर्ण करणार असे म्हणत असतात, पण त्यांच्या मनात कुठेतरी त्या दिवसाबद्दलची धास्ती वाढत असते.

जे फक्त नोकरी आणि घर या मध्येच अडकलेले असतात, ते आता काहीही करायचे नाही या विचारानेच खचून जातात, व एकलकोंडेपणा जवळ करतात.

जे आपल्या ठराविक नोकरीच्या दरम्याने नोकरीव्यतीरीक्त इतर कामात आपले मन गुंतवतात त्यांचे निवृत्तीनंतरचे वेळापत्रक ठरलेले असते, ते मग या नविन साच्याला जवळ करतात.
दोन मुंग्या जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा त्या दोघांमध्ये जे चालते त्याला किसींग सीन म्हणावे की त्यांच्यात चाललेला मुक्त संवाद ? (खास करुन लहान काळ्या मुंग्या ज्यांना आपण धावर्‍या किंवा हावर्‍या मुंग्या म्हणतो त्या)

Sunday, October 9, 2011

अश्वथामा आणि दूध एक प्रश्न.

महाभारतात असा एक प्रसंग आहे की अश्वथामा लहान असताना पांडवाना दूध पीताना पहातो, व घरी आल्यावर आपल्या आईकडे दूधासाठी हट्ट करतो. घरात त्याला द्यायला दूध नसते व दुध घे॓ण्याची त्यांची ऐपतही नसते, मग त्याची आई पाण्यात पीठ (कदाचित ज्वारीचे असेल) कालवून अश्वथाम्याला ते दूध आहे असे संगून प्यायला देते, अश्वथामा ते दूध असे समजून आनंदाने पीतो.

मग प्रश्न असा पडतो की त्या आधी अश्वथाम्याने दूध चाखलेच नव्हते का किंवा पाहीले नव्हते ?

  1. अश्वथाम्याचे वडील गुरु द्रोणाचार्य तर कौरव व पांडव यांचे गुरु अन हस्तिनापूरचे राजगुरु मग त्यांना एवढेही मानधन मीळत नव्हते का ?
  2. श्रीकृष्णाच्या त्या काळात दूध एवढे महाग होते का ?

या कथेमागच मतीतार्थ काय ?

आत्मा अमर आहे का

एक मुलगा असतो त्याचे नाव आत्मा असते त्याच्या वडिलांचे नाव अमर असते व त्याचे आडनाव ते या कथेसाठी जरुरी नाही.

तर या आत्मा नामक मुलाला शाळेत बसल्या बसल्या पेंगळण्याची सवय असते.

एकदा काय होते, तो मुलगा देवळात एका प्रवचनाला जातो, प्रवचनाचा विषय असतो ‘शरीर आणि आत्मा’ बोलता बोलता प्रवचनकार सहज मोठ्याने म्हणतो ‘आत्मा अमर आहे का’ तेवढ्यात हा आत्मा नावाचा मुलगा पेंगळलेल्या अवस्थेतून दचकून जागा होतो अन जागेवरुन उभा रहात हात वर करुन मोठ्याने म्हणतो ‘हजर गुरुजी’

Friday, October 7, 2011

कीती बदलला ना तो ?

एखाद्या माणसाबद्दल आपण आपले आडखे मांडत असतो, अमूक एखादा माणूस अमक्या तर्‍हेनेच चालणार, बोलणार, वागणार, त्याचे वर्तन आपण गृहीत धरलेल्या आपल्या साचीव आडाख्यातच आसणार हे आपण पक्के ठरवलेले असते. काही वेळेला आपण आपल्या मनात त्याच्या वागण्याबद्दल ठरवलेले विचार त्याच्या समोर मांडतो देखील.

तो माणूस जरासुद्धा आपाल्या ठरवलेल्या आडख्याच्या बाहेर वागला तर आपण लगेच आपली प्रतिक्रया व्यक्त करतो, ‘’कीती बदलला ना तो ?’’

आपण शब्दांचे अर्थ लावण्यास कीती तरबेज असतो नाही. एखादा माणूस काही तरी बोलतो आहे, त्याच्या मागचा मतीतार्थ लक्षात न घेता आपण त्या बोलण्याचा वेगळाच अर्थ लावून घेतो. आपल्याला सोयीस्कर

आत्मा

एकदा का देह ठेवला की जो चैतन्य आत्मा असतो, तो मन नावाच्या इच्छेच्या आहरी गेलेल्या रुपात गुरफटलेला असतो. जो पर्यंत मन पुर्ण निविकल्प/निर्विषाय होत नाही होत नाही, तो पर्यंत त्याचा जीवात्मा कोणते ना कोणते तरी रुप धारण करतो.

जो आत्मा असतो तो विशीष्ट धेय घेउन देहात प्रवेशकर्ता झालेला असतो, पण तो आत्मा या जगात आल्यावर इथल्या विलोभनीय संबंधांच्या नात्यात गुंतून राहतो, व आपले कार्य विसरुन जातो. या देहाच्या मर्यादेप्रमाणे त्याल कोठे न कोठे तरी थांबवे लागते, पण जो आत्मा असतो त्याला थांबणे मान्य नसते, व जेव्हा देह ठेवल्या नंतर तो दुसरा देह शोधतो, आणि हे चालू राहते

Wednesday, October 5, 2011

एकदा चित्रगुप्त विचारात पडले होते, व थोडेसे अस्वस्थही वाटत होते, असेच चार पाच दिवस गेले. त्यांचा हा अस्वस्थपणा काही जणांच्या ध्यानात आला, जे आपल्या पूढच्या जन्मात गाढव, डुक्कर, माकड, कोल्हा, लांडगा, गीधाड, जळू (जे रक्त शोषून घेते ते) म्हणून जन्म घेणार होते.
त्यानी चित्रगुप्तला विचारले.


काय झाले चित्रगुप्त महाराज.

चित्रगुप्त म्हणाले. ‘काय सांगू, तुम्हा सगळ्यांना पृथ्वीवर परत जन्माला घालायचे आहे, पण काय करणार, पृथ्वीवर सध्या तुमच्या योनीची संख्या फुल्ल झालेली आहे, पण तुम्हाला तर आत्ताच पाठवायचे आहे, काय करायचे ते कळतच नाही’

त्यानी चित्रगुप्ताना विचारले ‘अहो चित्रगुप्त महाराज, माणसांचीही फुल्ल झाली आहे का ?’

चित्रगुप्त म्हणाले ‘माणसाच्या खूप जागा आहेत.’

ते परत म्हणाले ‘अहो चित्रगुप्त महाराज, मग त्यात काय मोठे आहे, तुम्ही आम्हाला माणसांच्या योनीत पाठवाना.’

चित्रगुप्त म्हणाले ‘असे कसे करता येईल, हे तुम्हाला गाढव, डुक्कर, माकड, कोल्हा, लांडगा, गीधाड, जळू (जे रक्त शोषून घेते ते) म्हणून जन्म घायचा आहे, अन तुम्ही माणूस म्हणून जन्म घेउ पहात आहात’

यावर ते म्हणाले ‘अहो चित्रगुप्त महाराज, तुम्ही आम्हाल माणूस म्हणून पाठवले तरी आम्ही आमचा गुणधर्म थोडाच सोडणार आहोत, आम्ही आम्हाला गाढव, डुक्कर, माकड, कोल्हा, लांडगा, गीधाड, जळू (जे रक्त शोषून घेते ते) म्हणून जगायचे होते त्याच तर्‍हेने जगणार.

हे त्यांचे म्हणणे चित्रगुप्तांना आवडले अन ते म्हणाले ‘मला आवडले, मी आता तुम्ही म्हणता तसेच करतो, चला मोठ्ठा गुंता सुटला.’

सध्या जी काही माणसे आपण पहातो ती याचाच परीणाम आहे असे आपल्याला वाटते का ?